MPSC मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना बार्टी मार्फत १५००० रुपये मिळणार ! मग आजच अर्ज करा
BARTI Big Opportunity!
महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी मोठी संधी! बार्टीमार्फत MPSC मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना 15,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 12 मार्च 2025 रोजी जाहीर झालेली राज्यसेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी 14 एप्रिल 2025 पूर्वी दिलेल्या गुगल फॉर्म लिंकवर ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे. अर्ज अपूर्ण राहिल्यास किंवा एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास उमेदवारी रद्द केली जाणार आहे.
यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- जातीचा दाखला
- रहिवासी प्रमाणपत्र
- MPSC पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र
- आधार कार्ड
- राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
महत्वाची सूचना: उमेदवाराने ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही अर्ज करणे बंधनकारक आहे. फक्त ऑनलाइन किंवा फक्त हार्ड कॉपी दिल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
जास्त माहितीसाठी: अधिकृत वेबसाइट किंवा बार्टी कार्यालयाशी संपर्क साधावा.