खुशखबर !! बँक ऑफ बडोदा १४६ पदांच्या भरतीप्रक्रियेत मुदतवाढ | Bank of Baroda Recruitment 2025
Bank of Baroda Recruitment 2025
तरुणांना बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी चालून आलेली आहे. ही संधी जावू देवू नका . आजच अर्ज करा ! बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामार्फत १४६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, आता अर्ज करण्यासाठी २५ एप्रिल २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
ही भरती कंत्राटी तत्त्वावर करण्यात येणार असून, बँकेत स्थिर आणि प्रतिष्ठेची नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीत सिनिअर रिलेशनशिप मॅनेजर (101 पदे), टेरिटरी हेड (17 पदे), वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट – विमा व गुंतवणूक (18 पदे), प्रायव्हेट बँकर – रेसिडंट प्रायव्हेट (3 पदे), ग्रुप हेड (4 पदे), उप संरक्षण बँकिंग सल्लागार (1 पद) आणि प्रोजेक्ट हेड – प्रायव्हेट बँकिंग (1 पद) या पदांचा समावेश आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी खुला, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना ₹600 अर्ज शुल्क भरावे लागेल, तर अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग व महिला उमेदवारांसाठी हे शुल्क केवळ ₹100 आहे. इच्छुक उमेदवारांनी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.in वर जाऊन ‘Careers’ टॅबमध्ये ‘Current Opportunities’ वर क्लिक करून अर्ज भरावा. अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत व शुल्क भरल्यानंतर अर्जाची प्रिंट घेणे आवश्यक आहे.
ही भरती प्रक्रिया थेट मुलाखती किंवा इतर निकषांद्वारे होणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आत अर्ज सादर करावा. बँक ऑफ बडोदा सारख्या प्रतिष्ठित बँकेत काम करण्याची ही सुवर्णसंधी असून, बँकिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी सज्ज असणाऱ्या उमेदवारांनी ही संधी नक्कीच हुकवू नये.