बँक ऑफ बडोदा मध्ये ४००० पदांची मोठी पदभरतीची जाहिरात आली, ऑनलाईन अर्ज सुरु!
Bank of Baroda Recruitment 2025
मित्रांनो, बँक ऑफ बडोदामध्ये मोठ्या प्रमाणात भरती जाहीर झाली असून इच्छुक उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. एकूण 4000 अपरेंटिस पदांसाठी ही भरती होत आहे. अर्ज प्रक्रिया 19 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होईल, आणि 11 मार्च 2025 ही अंतिम तारीख आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ₹15,000 ते ₹20,000 पर्यंत स्टायपेंड मिळणार आहे. या भरतीची पूर्ण माहिती आणि अर्ज कसा करायच्या याचा पूर्ण तपशील आम्ही येथे देत आहोत.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा: उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असावी तसेच स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे असून, आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सूट लागू आहे.
अर्ज शुल्क:
- सामान्य व ओबीसी प्रवर्ग: ₹800
- SC/ST उमेदवार: ₹600
- दिव्यांग (PWD) उमेदवार: ₹400
- सर्व उमेदवारांना GST शुल्क भरावे लागेल.
अर्ज प्रक्रिया:
- bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
- Career टॅबवर क्लिक करा.
- Current Opportunities वर क्लिक करा.
- Apprentice Apply लिंक निवडा.
- नोंदणी करून फॉर्म भरा, डॉक्यूमेंट्स अपलोड करा आणि शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
निवड प्रक्रिया:
- CBT परीक्षा (Computer-Based Test)
- भाषा चाचणी
- मेडिकल तपासणी
- डॉक्यूमेंट्स व्हेरिफिकेशन
परीक्षेत सामान्य ज्ञान, आर्थिक जागरूकता, संगणक ज्ञान आणि इंग्रजी यासंबंधी प्रश्न विचारले जातील. अधिक माहितीसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन तपासा. लवकरात लवकर अर्ज करा आणि सरकारी बँकेत नोकरीची संधी मिळवा!
नाही मला काय विचारायचं
मला अर्ज करायचा आहे कामा साठी कसा करायचा