महत्वाचं- बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी ५९२ पदांसाठी भरती जाहिरात आली, अर्ज सुरु!
Bank of baroda Bharti PDF Application Form 592 Post
मित्रांनो, आपल्या पैकी बऱ्याच जणांना बँकेत नोकरी करण्याची इच्छा असते, आणि अशा इच्छुकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी (कॉन्ट्रॅक्ट पोस्ट्स – मॅनेजर आणि इतर) भरती प्रक्रिया सुरू होत आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. भरतीसंबंधी सविस्तर माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ नोव्हेंबर असून, एकूण ५९२ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या भरतीची पुर्नरज प्रक्रिया आणि पूर्ण माहिती आम्ही खाली देत आहोत. (Bank of baroda Bharti PDF Application Form 592 Post)
बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर पदासाठी उत्तम संधी उपलब्ध आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय (CA/CMA/CFA/CS), B.E, B.Tech, M.Tech, M.E किंवा MCA ही पदवी असणाऱ्या उमेदवारांनाही अर्ज करता येईल. उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असणेही महत्त्वाचे आहे.
- पदाचे नाव – व्यवस्थापक, एमएसएमई, प्रमुख, प्रकल्प व्यवस्थापक, व्यवसाय व्यवस्थापक, इतर
- पदसंख्या – 592 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 25 – 40वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –19 नोव्हेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. फायनान्स, एमएसएमई, आणि डिजिटल विभागासाठी अर्ज करताना उमेदवाराने त्या क्षेत्राशी संबंधित पदवी प्राप्त केलेली असावी. अर्ज प्रक्रियेदरम्यान ६०० रुपयांची फी भरावी लागेल. भरतीसंबंधी अधिक तपशील बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
याशिवाय, सध्या इंडियन बँकेतही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. फायनान्शियल लिटरसी काउंसलर पदासाठी उमेदवारांना अर्ज करता येईल. इच्छुकांनी indianbank.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा.
12 वर जॉब आहे का
12 pass var job aahe ka