लवकरच !! आदिवासी आश्रमशाळेत शिक्षक भरती सुरु !

Ashram School Recruitment: Announcement Soon?

राज्यातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. त्यामुळे या रिक्त पदांची भरती करण्याची मागणी संस्थाचालकांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडे केली आहे. दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी देणाऱ्या या शाळांमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली आहे.

Ashram School Recruitment: Announcement Soon?

या पार्श्वभूमीवर राज्यातील अनुदानित आश्रमशाळांमधील संचमान्यता करून नोकरभरती सुरू करण्यासाठी सविस्तर तपासणी अहवाल सादर करण्याचे निर्देश डॉ. ऊईके यांनी प्रशासनाला दिले आहेत.

मंगळवारी (दि. १८) आश्रमशाळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांची भेट घेऊन विविध समस्यांवर चर्चा केली. या वेळी आमदार संजय पुरम, बाळासाहेब मांगुडकर, माजी आमदार अपूर्व हिरे, वैभव पिचड, आनंद ठाकूर, शिवराम झोले, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थाचालकांनी शिक्षक भरती तातडीने सुरू करावी, अनुदानाचे टप्पे वेळेत मिळावेत, तसेच शिपाई व लिपिक संवर्गातील भरतीला परवानगी द्यावी, अशी मागणी केली.

अनुदानित आदिवासी आश्रमशाळांना देण्यात येणारे अनुदान विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार द्यावे, शिक्षक भरती प्रक्रिया लवकर सुरू करावी, तसेच टप्प्याटप्याने दिले जाणारे अनुदान वेळेत मिळावे, या विषयांवरही बैठकीत चर्चा झाली. संस्थाचालकांना योग्य न्याय दिला जाईल, अशी ग्वाही मंत्री डॉ. उईके यांनी यावेळी दिली.

सरकारकडून आता या भरती प्रक्रियेवर लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आश्रमशाळांमधील रिक्त पदे भरली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.