खुशखबर! आरोग्यसेविकांच्या भरती डिसेंबरमध्येच पूर्ण होणार, नवीन अपडेट जाहीर!

Arogya sevika Bharti 2025


आपल्याला माहीतच आहे कि आरोग्य सेवक मॅजिक काही दिवस पासून अडकली आहे. या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकलेल्या जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आरोग्यसेविकांची भरती प्रक्रिया डिसेंबरमध्येच पूर्ण होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल वैद्यकीय रजेवर असल्याने त्या त्यापुढील आठवड्यात रुजू होतील. त्यानंतर भरती प्रक्रियेची फाइल जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे मान्यतेसाठी ठेवली जाणार आहे. त्यांनी मान्यता दिल्यानंतर पात्र व अपात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले जातील. हा नवीन अपडेट आज प्रकाशित झाला आहे. 

Arogya sevika Bharti 2025

 

कोरोनात आरोग्य विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याने महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामुळे आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. सरळसेवा भरती प्रक्रियेंतर्गत ५ ऑगस्ट २०२३ ला महिला आरोग्य सेविकांच्या तब्बल ५९७ रिक्त जागांसाठी जाहीरात प्रसिद्ध झाली होती. राज्य शासनाकडून भरती प्रक्रिया जलद गतीने राबवण्याची सूचना मिळाल्याने आरोग्य विभागाने १९ जुलै २०२४ ला उमेदवारांची परीक्षा घेतली. या परीक्षेतील गुणांच्या आधारे सर्वसाधारण प्रवर्गातील १७० उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.

यात ४३ उमेदवार प्रतीक्षा यादीत समाविष्ट आहेत. भरती प्रक्रिया ही निवडणुकीच्या अगदी तोंडावर झाल्यामुळे अंतिम यादी प्रसिद्ध करुन नियुक्तिपत्र देण्यास आचारसंहितेचा अडसर निर्माण झाला. ‘पेसा’ अंतर्गत ३५ पात्र व्यक्तींना नियुक्तिपत्र देऊन त्यांनी आचारसंहितेच्या काळात आरोग्यसेविका म्हणून जबाबदारी सांभाळली. आता आचारसंहिता संपताच उमेदवारांनी पुन्हा भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आग्रह लावून धरला आहे. प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, पुढील आठवड्यात आशिमा मित्तल यांच्या स्वाक्षरीनंतर भरतीची फाइल जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी सादर होणार आहे. आरोग्य विभागाने भरती प्रक्रियेत फक्त ऑक्झिलरी नर्स मिडवायफरी अर्थात, ‘एएनएम’ या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्राची अट घातली आहे. मात्र, काही महिलांनी पदवी अर्थात ‘जीएनएम’ व बी. एसस्सी (नर्सिंग) या प्रमाणपत्राच्या आधारे अर्ज सादर केला आहे. कागदपत्रांच्या पडताळणीत ज्या उमेदवारांकडे ‘एएनएम’ प्रमाणपत्र नव्हते, त्यांना अपात्रतेसंदर्भात कळविण्यात आले आहे. त्यामुळे अंतिम यादीतून अजूनही काही उमेदवारांची नावे कमी होण्याची शक्यता आहे.



2 Comments
  1. Anees tadavi says

    12 pass saati aahe ka

  2. Puja sonawane says

    Kab from nikalne vale hai ANM ke

Leave A Reply

Your email address will not be published.