महिलांना सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्ण संधी ,रत्नागिरी येथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू!!

Application Process Open for Anganwadi Sevika and Helper Positions!!

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी १ अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक महिला उमेदवारांनी २८ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत. अर्ज बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना रत्नागिरी १, साईप्रसाद बिल्डिंग, एकता मार्ग, मारुती मंदिर, के. सी. जैन नगर, ता. जि. रत्नागिरी येथे जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Application Process Open for Anganwadi Sevika and Helper Positions!!

या भरतीअंतर्गत पावस, पोमेडी बु., कुरतडे, चिंद्रवली, हातखंबा, दांडे आडोम, हरचिरी, झरेवाडी, खानू, वेळवंड, मिरजोळे, फणसोप, चांदोर, गोळप, चांदेराई, नाणीज, शिरगाव आदी ग्रामपंचायतींमधील विविध अंगणवाडी केंद्रांमध्ये सेविका आणि मदतनीस पदे भरली जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता व अन्य अटी:
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी किमान इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा समकक्ष) आवश्यक.
संबंधित गावातील महसुली गाव/वाडी/वस्ती/पाड्यातील रहिवासी असणे बंधनकारक.
वयोमर्यादा : किमान १८ वर्षे व कमाल ३५ वर्षे. (विधवा उमेदवारांसाठी कमाल वयाची मर्यादा ४० वर्षे.)
इतर आवश्यक कागदपत्रे: विधवा/अनाथ असल्यास प्रमाणपत्र, लहान कुटुंब प्रमाणपत्र (जास्तीत जास्त दोन हयात अपत्ये), जातीचा दाखला (असल्यास), किमान दोन वर्षांचा अंगणवाडी मदतनीस म्हणून अनुभव असल्यास त्याचा दाखला, MSCIT प्रमाणपत्र (असल्यास).
अर्ज प्रक्रिया व अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत (सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ६.१५) संपर्क साधावा. अपूर्ण अर्ज किंवा मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.