नोकरीची सुवर्णसंधी APMC संभाजीनगर भरती!-APMC Sambhajinagar Jobs!
APMC Sambhajinagar Jobs!
छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कनिष्ठ लिपिक, शिपाई, भूमिगत ऑपरेटर (भुईकाटा ऑपरेटर), विजतंत्री आणि वाहन चालक अशा विविध पदांसाठी एकूण १४ रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली आहे.
या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २ जून २०२५ असून, नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर आहे. अर्जदाराचे वय किमान १८ आणि कमाल ४३ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे – कनिष्ठ लिपिक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT किंवा तत्सम संगणक प्रमाणपत्र, तसेच मराठी टंकलेखन ३० शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रतिमिनिट प्रमाणपत्र आवश्यक आहे. शिपाई पदासाठी किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. भुईकाटा ऑपरेटरसाठी ITI (फिटर) आणि संगणक कोर्स आवश्यक आहे. विजतंत्रीसाठी ITI (इलेक्ट्रिशियन) व संगणक कोर्स लागतो, तर वाहन चालक पदासाठी १०वी उत्तीर्ण आणि चारचाकी जड वाहन चालवण्याचा परवाना असणे गरजेचे आहे.
भरतीसंदर्भातील सविस्तर माहिती व जाहिरात पाहण्यासाठी, तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, छत्रपती संभाजीनगर यांच्या अधिकृत संकेतस्थळावर http://apmcchhatrapatisambhajinagar.com भेट द्यावी. अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे.