CET च्या विद्यार्थ्यांचा संताप उफाळला!-Anger Over CET Delays!
Anger Over CET Delays!
राज्यातील विद्यापीठात जे विविध कोर्सेस आहेत त्यासाठी CET परीक्षा घेतल्या जातात. पण या परीक्षा झाल्यावर देखील निकाल वेळेवर लागत नाहीत. काही कोर्सेसचे निकाल लागलेत, पण CAP राउंड सुरूच नाही झाले. दुसऱ्या बाजूला खासगी विद्यापीठांनी मात्र आपले अॅडमिशन सुरू करून टाकलेत. हे सगळं जाणूनबुजून केलं जातं, असं युवासेनेचा आरोप आहे.
युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव म्हणाले की, जर CET सेलने पुढच्या सात दिवसात निकाल लावले नाहीत, तर विद्यार्थ्यांना आणि पालकांना घेऊन सेलच्या ऑफिसवर थेट आंदोलन करणार!
CET सेल ह्यांनी निकाल लावायला उशीर करायचा, किंवा निकाल लावले तरी CAP राउंड सुरू करायचं नाही. याचा थेट फायदा खासगी आणि अभिमत विद्यापीठांना होतोय. विद्यार्थी वैतागून शेवटी तिथंच अॅडमिशन घेतात. यातून खासगी विद्यापीठांना पैसा मिळतो, आणि CET सेल पण गप्प बसतो.
अश्या प्रकारांमुळे विद्यार्थी आणि पालक हैराण झालेत. अनेकजण म्हणतात की निकाल न लागल्यामुळे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती आहे. म्हणूनच, युवासेनेनं साफ इशारा दिलाय की, निकाल सात दिवसात लागले नाही, तर आंदोलन अटळ आहे.