माझी लाडकी बहीण योजनेचे मानधन मिळेना अंगणवाडी सेविकांमध्ये नाराजीचा सूर!
Anganwadi Sevika Payment
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अंगणवाडीसेविका, मदतनीस आदींकडून महिलांचे अर्ज भरून घेतले गेले. अंगणवाडी सेविका व मदतनीस या गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून महिलांचे अर्ज भरत असून, त्यांना एका अर्जासाठी ५० रुपये शासनाकडून मिळतील, असे सांगितले गेले. परंतु अद्यापही त्यांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्याने त्यांनी शासनाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. (Anganwadi Sevika Payment)
ग्रामीण स्तरावर शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मार्फतच राबविली जाते. परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सातत्याने अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या अर्जाच्या मानधनाबाबत वरिष्ठांकडे विचारणा केली असता, त्यांनी केवळ आश्वासने देत त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखविली. शासनाकडून कायमच कोणत्याही शासकीय भार अंगणवाडीवर टाकला जातो, परंतु त्या तुलनेत अंगणवाडी सेविकांना व मदतनिसांना सन्मानजनक मानधनही मिळत नाही व शासकीय योजना राबविल्याबद्दल त्याचा मोबदलाही मिळत नसल्याने जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविकांनी शासनाच्या भूमिकेबद्दल खंत व्यक्त केली आहे. योजनेचा