ऑनलाइन पद्धतीने अंगणवाडी भरती सुरु !-Anganwadi Recruitment Goes Digital!

Anganwadi Recruitment Goes Digital!

आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी ग्रामपंचायतीच्या दारात हेलपाटे मारायची गरज नाही बघा. पुणे जिल्हा परिषदनं राज्यात पहिल्यांदाच अंगणवाडी भरतीसाठी एक झकास ऑनलाइन पद्धत उभी केलीय. काय म्हणता? हो हो, खरंच!

Anganwadi Recruitment Goes Digital!आत्तापर्यंत सारं काही कागदावरच व्हायचं. अर्ज करा, नंतर चक्कर मारा, मग कागदं जमा करा. पण आता सगळं डिजिटल – मोबाईलवरून घरी बसून अर्ज करा, डॉक्युमेंट्स अपलोड करा, आणि थेट अपडेट्स मिळवा. एकदम सोप्पं!

जिल्ह्यात सध्या ४३९५ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदं आहेत, त्यातली ६९९ भरतीसाठी काढलीयत, त्यातली ५०१ भरलीही गेली. आता उरलेल्या रिक्त जागांसाठी सगळी भरती ही नव्या डिजिटल पद्धतीनं होणार. जून महिन्यापासून ही नवीन प्रणाली प्रत्यक्षात आणायचं प्लॅनिंग सुरु आहे.

नव्या पद्धतीचे फायदेसुद्धा भारीत!

  • पारदर्शकता: सगळं ऑनलाइन असल्यामुळे काहीही गोंधळ किंवा सेटिंग नाही.

  • वेळ वाचतो: अर्जदाराला गावच्या ऑफिसात धावपळ करायची गरजच नाही.

  • सुलभ अर्ज प्रक्रिया: घरी बसूनच अर्ज करा, डॉक्युमेंट्स अपलोड करा.

  • गुणांची यादीही ऑनलाइन: पारदर्शकतेने गुणवत्ता यादी तयार होणार.

  • भरती झपाट्यानं: निवडलेल्यांना ऑनलाइनच नियुक्ती आदेश मिळणार!

या सगळ्याच्या मागे आहे पुणे जिल्हा परिषदेचा स्मार्ट विचार. महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे म्हणाले, “कागदपञांबाबत तक्रारी टाळण्यासाठी आम्हीच राज्यात पहिल्यांदा ही प्रणाली तयार केली.”

तर बघा मंडळी, कोल्हापूरसकट संपूर्ण राज्यात आता भरती होणार डिजिटल पद्धतीनं!

Leave A Reply

Your email address will not be published.