परीक्षे शिवाय सरळ १२वी पास महिलांना नोकरीची सुवर्णसंधी; अंगणवाडीत तब्बल ४९७ पदांसाठी भरती, अर्ज सुरु!

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. अंगणवाडीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. तब्बल ४९७ पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही balvikasup.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या अंगणवाडीच्या या भरतीसाठी जो कोणी अर्ज करत असेल, त्यांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३५ वर्षे असावे.

Anganwadi Recruitment 2024

१२वी पास महिला उमेवारांसाठी नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. उत्तर प्रदेशमधील विविध जिल्ह्यांमध्ये ही भरती केली जाणार आहे. बाल विकास परियोजना कार्यालयाअंतर्गत डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ऑफिसर पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी महिलांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.या नोकरीसाठी एकूण ४९७ पदांवर भरती केली जाणार आहे. त्यातील गोंडा येथे २४३ पदे रिक्त आहे. देवरिया येथे २५४ पदे रिक्त आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवार ९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अर्ज करु शकतात.

अर्ज करताना लागणारी कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • 10वी प्रमाणपत्र आणि प्रमाणपत्र
  • ओळखपत्र
  • ईमेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • वय प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • कायम रहिवासी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • पदाशी संबंधित शैक्षणिक पात्रता
  • उमेदवाराची स्वाक्षरी

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बारावी पास केलेली असावी.या नोकरीसाठी १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी उमेदवारांनी निवड मेरिट बेसिसवर केली जाणार आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक प्रमाणपत्र, जन्म दाखला, रहिवासी प्रमाणपज्ञ, जाती प्रमाणपत्र, ओळखपत्र, फोटो ही कागदपत्रे लागणार आहेत. ग्रामीण भागातील बालविकासाशी संबंधित पदांवर काम करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांसाठी ही भरतीची संधी खास आहे. अंतिम मुदतीत तुमचा अर्ज सबमिट करून निवड प्रक्रियेत सहभागी होण्याची ही उत्तम संधी आहे.

 

1 Comment
  1. प्रतिक्षा प्रणय वाहुरवाघ says

    या अंगणवाडी सरळ सेवा भरती मधे exam होणार आहे का..

Leave A Reply

Your email address will not be published.