अंगणवाडीत नोकरी अन् पगार तब्बल १,१२,४०० रुपये! मुख्यसेविका पदांची भरती सुरु!
Anganwadi Mukhya Sevika Bharti
महिला व बाल विकास विभागा (Anganwadi Mukhya Sevika Bharti) अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत गट क संवर्गातील सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. १४ ऑक्टोबरपासून या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. ३ नोव्हेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
महाराष्ट्र राज्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) प्रकल्पांतर्गत सरळसेवेच्या कोट्यातील गट क संवर्गात मुख्यसेविका पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी १०२ रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी महिला व बालविकास विभागाद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.महिला व बाल विकास विभाग आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे. सरकारी नोकरी करण्याची ही चांगली संधी तुमच्याकडे आहे.
अंगणवाडी मुख्यसेविका/अंगणवाडी सुपरवायजर / पर्यवेक्षिका पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३५,४०० ते १,१२,४०० रुपये वेतन मिळणार आहे.
या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.२१ ते ३८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. राज्यातील २५ अंगणवाड्यांसाठी मुख्य पर्यवेक्षिका पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकांच्या कामांचे पर्यवेक्षण करणे हे मुख्यसेविकाचे काम आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. ३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. (Anganwadi MukhyaSevika Bharti)
आंगणवाडी भारती परीक्षा होनार आहे का
SEBC category age limitation
hi
Anganwadi bhrti form kuthe bharayache
Anganwadi form bharnya sathi link konti ahe
Jalgon jila made pn het ka jaagaa
Form kas baraych
Pune madhye pan aahet ka
Ma kola job pahije Aakkolkat
म्यारेज सरटफिकेट लागते का