इंजिनिअरिंग सोडून निकाल वेळेत!-All Results Out, Except Engineering!

All Results Out, Except Engineering!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं या वेळी खरंच वेळेवर काम केलंय! इंजिनिअरिंगच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या परीक्षा वगळता बाकी सगळ्या अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झालेत. आणि तर विशेष म्हणजे, निकाल लागलेल्या कोर्सेसच्या गुणपत्रिका ४ जुलैपासून मिळायला सुरुवात झालीये, पुढील १० दिवसांत सगळ्यांचं वितरण पूर्ण होणार!

All Results Out, Except Engineering!विद्यापीठानं एप्रिल ते जून या कालावधीत तब्बल १५७ अभ्यासक्रमांची परीक्षा घेतली होती. त्यातली निकाल प्रक्रियाही २४ मेपासून सुरुवात झाली आणि ३ जूनपर्यंत बहुतेक निकाल बाहेर पडले. यंदा चार वर्षात पहिल्यांदाच निकाल वेळेत लागल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय.

विधी अभ्यासक्रमात थोडा गोंधळ:
विधी कोर्सच्या २०० विद्यार्थ्यांचे निकाल काही कारणामुळे ७ जुलैपर्यंत राखीव ठेवलेत. विद्यापीठानं लवकरच तेही जाहीर करणार असं सांगितलंय.

नव्या तक्रार पोर्टलवर ३०० अर्ज!
यंदा विद्यापीठानं ऑनलाइन तक्रार निवारण पोर्टल सुरू केलं. निकालात त्रुटी आढळल्या की तिथं तक्रार नोंदवता येते. आतापर्यंत जवळपास ३०० तक्रारी दाखल झाल्या असून, १५ दिवसांत निवारण होणार, अशी हमी विद्यापीठानं दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.