Re-Examसाठी SPPUत खळबळ!-SPPU Re-Exam Protest Erupts!

SPPU Re-Exam Protest Erupts!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) २०१९ पॅटर्नच्या इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी Re-Examसाठी जोरदार आंदोलन केलं. एखाद-दोन विषयात नापास झाल्यानं वर्षभराची वाट लागतेय, म्हणून NSUIच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर घोषणा देत निदर्शने केली.

SPPU Re-Exam Protest Erupts!प्रशासन थंड, विद्यार्थी आक्रमक!
प्रशासनाकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून विद्यार्थी थेट गेटवर चढले, गेट फोडलं आणि आत घुसले. त्यामुळे संपूर्ण परिसरात गोंधळ, तणावाचं वातावरण पसरलं. पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावून परिस्थिती नियंत्रणात आणली.

कोण-कोण होते आंदोलनात?
विद्यार्थी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव अक्षय जैन, जिल्हाध्यक्ष भूषण रानभरे, रौनक खाबे, महेश कांबळे, तेजस बनसोड, अभिषेक पवार, श्रद्धा डोंड यांसह अनेक पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.