पशुपालनाला मिळालं शेतीचं मान!-Animal Farming Now Agri-Tagged!
Animal Farming Now Agri-Tagged!
महाराष्ट्र शासनानं एकदम झकास निर्णय घेतलाय! दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन आणि वराहपालन आता थेट शेतीच्या दर्ज्याला समकक्ष करण्यात आलंय. ह्या निर्णयामुळे लाखो पशुपालकांना कर्ज, सोलर सुविधा, विमा आणि कर सवलतीसारखे फायदे मिळणार हाय.
राज्य मंत्रिमंडळानं हा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानं आता पशुपालकांचं उत्पादन वाढणार, खर्च कमी होणार आणि गावाकडं रोजगारही वाढणार. विशेष म्हणजे, आत्महत्या करत असलेल्या शेतकऱ्यांनाही यातून दिलासा मिळणार, असं सरकारनं सांगितलंय.
या योजना कुणासाठी?
- १०० दुधाळ जनावरं
- ५०० शेळ्या-मेंढ्या
- २०० डुकरं
- २५,००० मांसल कुक्कुट
- ५०,००० अंडी उत्पादक कुक्कुट
- ४५,००० क्षमतेचं हॅचरी युनिट
काय मिळणार?
▪️ कर्जावरील व्याजात सवलत
▪️ सोलर पंप व संयंत्रांवर अनुदान
▪️ करात सवलत ग्रामपंचायत स्तरावर
▪️ विमा आणि नुकसान भरपाई योजना
▪️ नवे बियाणं-खते थेट शेतावर