CET चुकांवर कुलगुरूंची कमिटी!-CET Panel Under VC Formed!

CET Panel Under VC Formed!

सालं बघा ना, ६.७७ लाख विद्यार्थ्यांनी दिलेल्या CET परीक्षेत २१ भाषिक चुका झाल्या होत्या. मराठी आणि उर्दू प्रश्नपत्रिकेत गडबड झाली आणि निकाल बिघडले.

CET Panel Under VC Formed!२७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांवर परिणाम झाला. त्यामुळे फेरपरीक्षा घ्यावी लागली.
आता अशी गडबड पुन्हा होऊ नये म्हणून कुलगुरू डॉ. सुनील भिरुड यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यीय समिती नेमण्यात आलीये.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितलं –

“या समितीकडून तज्ज्ञांची नेमणूक, प्रश्नसंच पद्धती, आणि प्रश्नपत्रिका तयारीची नवीन कार्यपद्धती निश्चित केली जाईल.”

तसंच, ज्यांनी चुकीचे पेपर तयार केले होते, त्यांच्यावर कारवाईही झालीये – तीन सदस्यांना नोटीस देऊन सेवेतून हटवलं गेलं.

भविष्यात सीईटी परीक्षा राज्याबाहेर न घेण्याचाही निर्णय घेण्यात आलाय, कारण गेल्या काही वर्षांत TCS आणि IBPSमार्फत घेतलेल्या परीक्षांमध्ये तब्बल ८९ प्रकरणांत गोंधळ झालाय.

Leave A Reply

Your email address will not be published.