शिक्षण खात्यात ३०० नोकऱ्या!-300 Edu Jobs Soon!
300 Edu Jobs Soon!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुख्य कार्यालयासह नागपूर, अमरावती, लातूर, संभाजीनगर, औरंगाबाद, नाशिक अशा नऊ विभागीय कार्यालयांमध्ये क्लर्क व तांत्रिक मिळून जवळपास ३०० पदं रिक्त आहेत.
गेल्या काही वर्षांत अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले, काही पदं रिक्तच ठेवण्यात आली. त्यामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढलाय. यामुळे परीक्षा, निकाल, प्रशासकीय कामं यावर परिणाम होत आहे.
या ताणतणावातून बाहेर यायचं असेल, तर भरती हवीच! म्हणून शासनाने या ३०० पदांची भरती करण्याचा निर्णय घेतलाय. यात २८० पदं कनिष्ठ लिपिक (क्लर्क) आणि उरलेली तांत्रिक पदं आहेत.
सध्या प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आलाय. प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत परीक्षा घेतली जाईल आणि निवड प्रक्रिया सुरू होईल.
या भरतीमुळे राज्य शिक्षण मंडळाची कार्यक्षमता वाढणार असून, स्थानिक युवकांना सरकारी नोकरीची चांगली संधी उपलब्ध होणार आहे.