नर्सिंग प्रवेश! शेवटची संधी!-Nursing Last Call Apply!

नर्सिंग शिकायचंय का? तर मग घाई करा! बीएससी नर्सिंग आणि जीएनएम अभ्यासक्रमासाठी अर्ज भरायची संधी १७ जुलै (B.Sc.) आणि १९ जुलै (GNM) पर्यंत उपलब्ध हाय.

Nursing Last Call Apply!सीईटी सेलमार्फत नर्सिंग अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आली. यंदा राज्यभर १२ हजाराहून अधिक बीएससी नर्सिंगच्या जागा उपलब्ध आहेत. एप्रिल महिन्यात झालेल्या परीक्षेत ४३ हजारांहून जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. निकाल १५ मे रोजी लागला, पण प्रवेश प्रक्रिया उशिरान सुरू झाली.

GNM अभ्यासक्रमासाठीही राज्यातल्या विविध जिल्हा रुग्णालयांत ९६० जागा उपलब्ध आहेत. ह्या अभ्यासक्रमासाठी १९ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.

दोन्ही अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी CET परीक्षा अनिवार्य असून, नोंदणीनंतरच्या प्रवेश फेऱ्यांचं वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.

महत्त्वाचं:

  • B.Sc. Nursing – अर्जाची अंतिम तारीख: १७ जुलै २०२५

  • GNM – अर्जाची अंतिम तारीख: १९ जुलै २०२५

Leave A Reply

Your email address will not be published.