108 चालकांचं थांबणं, हक्कासाठी रण!-108 Strike for Rights!

108 Strike for Rights!

धुळे-जळगाव भागात 108 रुग्णवाहिकेचे चालक काम बंद आंदोलनावर उतरलेत! अनेक वर्षांपासून सेवा देऊनसुद्धा योग्य वेतन, सुरक्षा, आणि सन्मान मिळत नाय, म्हणून अखेर राग व्यक्त करत ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलनास बसलेत.

108 Strike for Rights!याच मागण्यांसाठी 13 मे रोजी आझाद मैदानावर आंदोलनही झालं होतं. त्यात शासन आणि बीव्हीजी कंपनीनं सकारात्मक भूमिका घेण्याचं सांगितलं होतं. पण गेल्या महिनाभरात काहीच हालचाल न झाल्यानं आता चालक म्हणत्यात – “आता बस झालं, आम्ही आवाज उठवणारच!”

बीव्हीजी कंपनीकडून न प्रतिसाद, न बैठक – त्यामुळेच कर्मचाऱ्यांत तीव्र नाराजी आहे.
त्या लोकांची मागणी हाय:

  • समान काम, समान वेतन

  • 2014-2017 चा PF परत मिळावा

  • कोविड भत्ता तातडीनं द्यावा

  • रुग्णवाहिकांना योग्य देखभाल आणि ड्रायव्हरला विमा संरक्षण द्यावं

अनेक चालकांनी काम थांबवून, अध्यक्ष अशोक कराळे, उपाध्यक्ष अतुल शिंदे आणि संघटनेचे प्रतिनिधींसह आंदोलन सुरु केलंय.

ते म्हणत्यात – “रुग्णांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही आत्तापर्यंत काम करत होतो. पण आता कंपनीच दुर्लक्ष करत असल्यामुळे, आमचा संयम सुटला. लवकरात लवकर निर्णय घ्या, नाहीतर आंदोलन अधिक तीव्र होईल!”

Leave A Reply

Your email address will not be published.