बॅकलॉग? तरीही फायनलला जा!-Backlogs? Go Final Anyway!

Backlogs? Go Final Anyway!

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठानं ह्याच शैक्षणिक वर्षापासून एक जबरदस्त निर्णय घेतलाय! आता बॅकलॉग असला तरी थेट अंतिम वर्षात प्रवेश मिळणार, कारण ‘कॅरिऑन पद्धत’ लागू केली गेलीय.

Backlogs? Go Final Anyway!आधी काय व्हायचं? फर्स्ट ईयरचं सगळं क्लिअर असलं पाहिजे, मगच फायनलमध्ये प्रवेश. सेकंड ईयरमध्ये दोन-तीन विषय पास असणं गरजेचं. पण आता ह्या नव्या पद्धतीमुळं – अगदी बॅकलॉगवाल्या विद्यार्थ्यांनाही फायनल इयरमध्ये सरळ प्रवेश मिळणार हाय!

कला, वाणिज्य, विज्ञान, फार्मसी, इंजिनीयरिंग अशा सगळ्या शाखांमधल्या विद्यार्थ्यांना हा नियम लागू होतोय. वऱ्हाडातल्या अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यात हे बदल तडकाफडकी लागू झालेत.

विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून, शिक्षणात खंड नको म्हणून विद्यापीठ परिषदेनं साधारण ७० सदस्यांच्या समोर ठराव मंजूर केला. आता मुलं हळूहळू विषय क्लिअर करत पदवी मिळवू शकणार.

ह्या पद्धतीचा फायदाः

  • अभ्यासात गॅप नाही

  • बॅकलॉग असूनही प्रवेश

  • क्रेडिट सिस्टीम (CGS/CBGS) असणाऱ्यांना लागू

बाकी विद्यापीठंही ह्या पद्धतीकडे वळतील का? हे बघावं लागणार!

Leave A Reply

Your email address will not be published.