ई-रेशननं घराघरात दिलासा!-E-Ration Brings Relief to Thousands!
E-Ration Brings Relief to Thousands!
नाशिक जिल्ह्यात ई-रेशनकार्ड वाटपाला चांगलाच वेग आलाय. तब्बल ३१ हजाराहून जास्त कुटुंबांनी गेल्या सहा महिन्यांत आपापली ऑनलाइन शिधापत्रिका मिळवली हाय. ऑक्टोबर २०२४ पासून सुरू झालेल्या ह्या प्रणालीमुळं एजंटगिरीला चाप बसलाय आणि सर्वसामान्यांना घरबसल्या कार्ड मिळतंय.
धान्य वितरण खात्यानं विकसित केलेल्या RCMS प्रणालीमुळं आता आधारकार्डप्रमाणे स्वतःचं रेशनकार्ड प्रिंट करून घ्यायची सोय उपलब्ध झाली हाय. पिवळं, केशरी, सफेद, आणि अंत्योदय – सर्व श्रेणीतील कार्ड आता ऑनलाइनच दिले जातायत.
सध्या १५ लाखांपेक्षा जास्त रेशनकार्डधारक जिल्ह्यात आहेत. त्यापैकी:
-
प्राधान्यक्रमाचे १९,६३४ कार्ड,
-
बिगर प्राधान्यक्रमाचे ९,९४१,
-
अंत्योदयचे ७००,
-
आणि सफेद ८७१ कार्डं ऑनलाइन दिली गेलीत.
सरकारचा उद्देश असा हाय की लोकांनी ऑफिसात जाऊन रांगा लावू नयेत आणि सगळं काम घरबसल्या पार पडलं पाहिजे. ई-रेशन हाच मार्ग पुढे वाटचाल दाखवतोय!