निकाल लागला, पण नाव नाही!-Result’s Out, But No Name!
Result's Out, But No Name!
पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. पण हायरे! बऱ्याच हुशार विद्यार्थ्यांची नावेच गुणवत्ता यादीत दिसत नाहीत.
पाचवीसाठी तब्बल ५ लाख ६३ हजार विद्यार्थ्यांनी नाव नोंदवलं होतं. त्यातले ५ लाख ४७ हजारांनी परीक्षा दिली. यापैकी १ लाख ३० हजार मुलं शिष्यवृत्तीस पात्र ठरली. आठवीच्या बाबतीत पण असंच – ३ लाख ७८ हजार मुलांनी नाव दिलं, ३ लाख ६५ हजारांनी पेपर दिला आणि त्यातले ७० हजारांच्या जवळपास पात्र ठरले.
पण यादीत नाव यायचंय तर बँक खाती, आधार क्रमांक, योग्य शाळा आणि वयोमर्यादा या सगळ्या निकषांवर पात्र असावं लागणार. जरी विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले तरी शासनमान्य शाळा नसेल, वय जास्त असेल किंवा अपूर्ण माहिती असेल, तर त्यांना शिष्यवृत्ती यादीत जागा नाही मिळणार.
हुशारी असूनही नियमांमुळे बरेचजण यादीबाहेर! निकाल mscepune.in वर पाहा.