NIT मध्ये मेगा नोकरीचा मोका!-Mega NIT Jobs!
Mega NIT Jobs!
शिकूनसुध्दा अजून नोकरी मिळाली नाही म्हणून टेंशन घेताय का? मग आता टेंशन घेऊ नका! कारण NIT जमशेदपूरमध्ये नॉन-टीचिंग पदांसाठी जोरदार भरती सुरू झाली हाय!
ज्यांना सरकारी नोकरीची वाट बघताय त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधीच आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जुलै २०२५ आहे. अर्ज nitjsr.ac.in या अधिकृत वेबसाईटवरून भरायचा हाय.
ही भरती ग्रुप A, B, आणि C मधल्या अनेक पदांसाठी आहे – प्रिन्सिपल सायंटिफिक ऑफिसरपासून, फार्मासिस्ट, टेक्निशियन, जूनियर असिस्टंट, इंजिनिअर, लायब्रेरियन अशा विविध पदांची संधी आहे.
पात्रता ही पदानुसार आहे – B.E./B.Tech, M.Sc., MCA, १२वी वगैरे. आणि वयमर्यादाही पदांनुसार २७ ते ५६ वर्षांपर्यंत ठेवलं हाय.
पगार? तोही जबरदस्त – ₹२५,००० पासून ₹१,४४,२०० पर्यंत! आणि इतर भत्ते वेगळेच!
फीससुद्धा ग्रुपनुसार – ५००, १००० आणि २००० अशी आहे.
म्हणून मंडळी, वेळ वाया घालवू नका. सर्व कागदपत्रं गोळा करा, पात्रता तपासा आणि भराभर अर्ज करा. सरकारी नोकरीची दारं तुमच्यासाठी उघडी आहेत!