भरतीची फाईल तशीच! विकास रखडला!-Hiring On Hold, Development Delayed!

Hiring On Hold, Development Delayed!

मिरा-भाईंदर महापालिकेमध्ये कर्मचारी कमी पडतायत म्हणून प्रशासन हमखास ओरडतंय, पण भरती मात्र दोन वर्षांपासून थांबलेलीच आहे! राज्य सरकारनं सुद्धा मंजुरी दिलीय, पण महापालिकेनं अजून एकही माणूस भरलेला नाहीये!

Hiring On Hold, Development Delayed!पालिकेमध्ये जवळपास २५६४ पदं आहेत, त्यात १०७८ जागा रिकाम्याच आहेत. काही जागा तर इतक्या महत्त्वाच्या की, त्याच्या अभावामुळे विकासकामंच थांबलेत. राज्यसरकारनं दोन वर्षांपूर्वीच रिक्त पदं भरा म्हणून फर्मान सोडलं, पण पालिकेनं केवळ ३३९ जागांसाठी प्रस्ताव पाठवला आणि २०२३ च्या फेब्रुवारीत मंजुरी मिळाली. पण साहेब, अजूनही भरतीचा नामोनिशाण नाही!

जुनिअर इंजिनिअर, क्लार्क, सर्व्हेअर, प्लंबर अशा ४५ जागा पहिल्या टप्प्यात भरायच्या होत्या. पण इंजिनिअरच नाहीत म्हणून टेंडरच्या माध्यमातून बाहेरच्यांना कामं दिली जातायत आणि त्यामुळे गुणवत्तेवरही प्रश्न येतोय.

यातच परिवहन सेवा तर आणखीच ढासळलीये. तिकडं स्वतंत्र अधिकारीच नाही, दुसऱ्याच अधिकाऱ्यावर ही जबाबदारी टाकलेलीय. अग्निशमन दलात सुद्धा कर्मचारी भरती झाली नाहीये – लोकसंख्या वाढतेय, पण यंत्रणा तशीच आहे.

आता खासगी कंपन्यांचीही मजा चाललीय. भरती प्रक्रियेसाठी IBPS ला काम दिलं गेलं होतं, पण त्यांनी दादच दिली नाही! मग टीसीएसला काम देण्यात आलं, पण त्यांनाही ३-४ महिने झालेत, काही हालचाल नाही. त्यामुळे खरंच भरती होणार का, हाच प्रश्न!

आयुक्त राधाबिनोद शर्मा म्हणालेत – “प्रक्रिया सुरू आहे, स्वतः पाठपुरावा करतोय.” पण नागरिक म्हणतात – “कधी होणार, हेच कळेना!”

Leave A Reply

Your email address will not be published.