बांधकाम मजुरांच्या मुलांना शिष्यवृत्ती!-Scholarships for Workers’ Children!
Scholarships for Workers' Children!
महाराष्ट्र सरकारनं बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या गरीब कामगारांसाठी एक जबरदस्त योजना राबवली आहे – बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना २०२५. ह्या योजनेतून कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जातंय. शालेय शिक्षणापासून वैद्यकीय व इंजिनिअरिंगपर्यंतचा खर्च उचलायचं काम सरकार करतंय.
उद्देश काय हाय ह्या योजनेचा?
कामगार लोकांना मुलांना शिक्षण द्यायचंय, पण पैशाअभावी शक्य होत नाही. म्हणून राज्यानं ही योजना आणलीय. यातून त्यांच्या शिक्षणाचा खर्च सरकार भरून काढणार. त्यामुळे कामगारांची लेकरं आता मोठ्या शिक्षणाच्या स्वप्नांपुढं उभी राहू शकतात.
कोण घेऊ शकतं लाभ?
कामगाराची नोंदणी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात असायलाच पाहिजे. विद्यार्थी आणि पालक, दोघंही महाराष्ट्रातले रहिवासी असायला हवेत. मागील वर्षी ५०% गुण मिळवलेले असणं गरजेचं. विशेष म्हणजे, जर कामगाराची बायको शिकत असेल, तिलाही शिष्यवृत्ती मिळू शकते!
शिष्यवृत्तीची रक्कम – शिक्षणानुसार थेट हिशेब:
-
1वी ते 7वी: ₹2,500
-
8वी ते 10वी: ₹5,000
-
11वी-12वी: ₹10,000
-
पदवी: ₹20,000
-
पदव्युत्तर: ₹25,000
-
इंजिनिअरिंग: ₹60,000
-
वैद्यकीय शिक्षण: ₹1,00,000
कसा करायचा अर्ज?
ऑनलाईन अर्ज: mahabocw.in वर जाऊन “Apply Online” क्लिक करा. फॉर्म भरा आणि डॉक्युमेंट अपलोड करा.
ऑफलाइन अर्ज: बांधकाम कामगार कार्यालयात जाऊन फॉर्म घ्या किंवा वेबसाइटवरून डाउनलोड करा.
लागणारे कागदपत्र:
कामगार नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड (विद्यार्थी आणि पालक), रेशन कार्ड, बँक पासबुक, बोनाफाईड सर्टिफिकेट, मागील गुणपत्रक, फोटो, मोबाईल नंबर इत्यादी.
ही योजना फक्त पैसे देणारी नाही, तर…
योजना गरीब लोकांच्या लेकरांना शिकायला मदत करते. डॉक्टर, इंजिनिअर, संगणक अभियंता बनण्यासाठी गरजेचं शिक्षण आता सहज मिळतंय. ही योजना म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून कुटुंबाला आणि समाजाला वर नेण्याचा एक टप्पा!