महिलांना मोफत किचन किट!-Free Kitchen Kits for Women!

Free Kitchen Kits for Women!

महाराष्ट्रातल्या बांधकाम क्षेत्रात राबणाऱ्या मेहनती महिलांसाठी सरकारनं एक दिलासादायक योजना सुरू केलीय. २० जून २०२५ पासून लागू झालेल्या या योजनेअंतर्गत, पात्र बांधकाम कामगारांना मोफत किचन किट देण्यात येणार आहे.

Free Kitchen Kits for Women!ह्या किटमध्ये रोजच्या घरगुती वापरात येणाऱ्या अकरा उपयोगी वस्तू असणार आहेत, ज्यात अन्नसाठ्याच्या पेट्या, चटई, चादर, ब्लँकेट, साखर-चहा डबे आणि अगदी पाण्याचं फिल्टर सुद्धा मिळणार आहे!

राज्य सरकारचं म्हणणं आहे की, केवळ कामगारांना रोजगार देऊन उपयोग नाही, तर त्यांच्या जगण्याच्या गुणवत्तेत सुधारणाही तेवढीच गरजेची आहे. ह्याच हेतूनं ह्या योजनेचा आराखडा तयार करण्यात आलाय.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी केलेली असावी, स्मार्ट कार्ड असणं आवश्यक आहे आणि ते महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असले पाहिजेत. अर्ज करताना आधार कार्ड, स्मार्ट कार्ड, आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर याची झेरॉक्स आवश्यक आहे.

अर्ज कसा करायचा?
जिल्हा कामगार सुविधा केंद्र किंवा तालुका कामगार कार्यालयात जाऊन नमुना भरून द्यावा, किंवा जवळच्या सायबर कॅफेत जाऊन ऑनलाइन अर्ज करता येतो. अर्ज करताना एक लहानशी नाममात्र फी लागेल.

सरकार या संपूर्ण योजनेत दर्जेदार वस्तू देणार असून, प्रत्येक वस्तूची प्रयोगशाळेत कसून तपासणी होणार आहे. जिल्हा कामगार अधिकारी आणि सहाय्यक आयुक्तांच्या देखरेखीखाली किट वाटप होईल. लाभार्थ्यांना योग्य पोचपावतीही दिली जाणार आहे.

या योजनेमुळे कामगार कुटुंबांचा आर्थिक भार कमी होईल, आणि घरात थोडा स्थैर्य येईल. सरकारच्या या उपक्रमामुळे कामगारांच्या जगण्यात खरा बदल घडून येईल. तुम्ही जर पात्र असाल, तर ही सुवर्णसंधी गमावू नका. अर्ज करा आणि सरकारकडून मिळणाऱ्या या किचन किटचा लाभ घ्या!

Leave A Reply

Your email address will not be published.