शिक्षक भरतीत गोंधळ उफाळला!-Teacher Recruitment Turns Chaotic!

Teacher Recruitment Turns Chaotic!

महापालिकेच्या शिक्षण विभागानं शिक्षक भरतीसाठी दिलेली जाहिरात सरळच गोंधळात टाकणारी ठरली. १८ जूनला बालवाडीसाठी कंत्राटी शिक्षकांची जाहिरात काढण्यात आली होती.

Teacher Recruitment Turns Chaotic!जाहिरातीत दिलेली अर्हता पूर्ण असणारे D.Ed आणि B.Ed उमेदवार गुरुवारी मुलाखतीला आले, त्यात महिलांचा भरपूर सहभाग होता. पण तेथे पोचल्यावर अनेकांना अपात्र ठरवलं गेलं. मग काय – तावातावानं महिला उमेदवारांनी महापालिकेच्या मुख्यालयात ठिय्या दिला.

“जाहिरातीत B.Ed/D.Ed लिहिलं होतं, मग आम्ही का अपात्र?” – असा थेट सवाल महिलांनी केला. काहीजणी तर लहान मुलांना घेऊन सकाळपासून रांगेत होत्या. पण अधिकारी म्हणाले, “तुम्ही B.Ed/D.Ed असल्यामुळे पात्र नाही!” आता हे कुठलं लॉजिक?

ऑनलाइन अर्ज करतानाही अनेक चुका होत्या – तारखा चुकीच्या, वर्षं गडबडीत, तरीही उमेदवारांनी भरवसा ठेवून अर्ज केला. पण मुलाखतीला येताना दस्तऐवज घेणं तर सोडाच, फक्त एक टोकन नंबर हातात दिला. त्यामुळे सगळा प्रकार फारच एकतर्फी आणि दिशाभूल करणारा वाटतोय, असं उमेदवारांचं म्हणणं.

ही परिस्थिती बघून महिलांनी थेट आयुक्तांची भेट घेण्याची मागणी केली. मग महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी स्वतः येऊन उमेदवारांशी चर्चा केली आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करू, असं आश्वासन दिलं. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.

या भरतीत २५ शिक्षक पदांवर भरती होणार असून मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमाच्या बालवाड्यांमध्ये ही भरती कंत्राटी तत्त्वावर आणि २० हजार रुपयांच्या मानधनावर होणार आहे. मात्र, चुकीच्या जाहिरातीत ‘कोणतीही पदवी + D.Ed (ECCE)’ पात्रता चालेल असं सांगून प्रत्यक्षात उमेदवारांना डावलल्यामुळेच हा गोंधळ झाला, असं स्पष्ट दिसतंय.

Leave A Reply

Your email address will not be published.