पशुसंवर्धन विभागात ३२९ पदांची थेट भरती ! मुंडे ताईंचा भरतीचा बाण!-Munde Tai’s Recruitment Arrow!
Munde Tai's Recruitment Arrow!
पशुपालकांसाठी दिलासादायक बातमी ! आपल्या गावकऱ्यांना नीटशी पशुधन सेवा मिळावी म्हणून, आपल्या पशुसंवर्धन खात्याला बळकटी देण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ताईंनी एकापाठोपाठ एक जोरदार निर्णय घेतले.
मागं काहीच दिवसात गट-अ मधल्या २,५९५ पशुधन विकास अधिकारी पदांसाठी मागणी करण्यात आली होती, आणि आता तर थेट ३२९ सहायक आयुक्त पदांची भरती सुरू करण्यात आलीय! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडं (MPSC) ह्या साठी जाहिरात निघालीये आणि अर्ज प्रक्रियाही सुरू झालीये.
पशुसंवर्धन विभागात रिक्त असलेल्या जागांमुळे शेतकऱ्यांना वेळेवर सेवा मिळत नव्हती, ते लक्षात घेऊन मुंडे ताईंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेतलेत.
एमपीएससीकडून ३२९ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून २० जून २०२५ पर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
ही भरती पूर्ण झाली की ग्रामीण भागांत पशुसंवर्धन सेवा वेगानं आणि पूर्ण क्षमतेनं सुरू होईल. त्यामुळे शेतकरी बांधवांना तात्काळ व दर्जेदार सेवा मिळेल, असं मुंडे ताईंनी सांगितलं.