India Post GDS तिसरी यादी जाहीर!-India Post GDS 3rd List Out!

India Post GDS 3rd List Out!

भारतीय टपाल खात्यानं 2025 सालच्या ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर केली राव! ही यादी त्यांच्या सरकारी वेबसाइटवर – indiapostgdsonline.gov.in इथं टाकलीय. आपल्यालाही राज्यानुसार ती डाउनलोड करून नाव आहे का हे बघता येतं.

India Post GDS 3rd List Out!

२१,४१३ जागांसाठी घ्या भरती

ग्रामिण डाक सेवक, ब्रांच पोस्टमास्टर (BPM), अ‍ॅसिस्टंट BPM यांच्या एकूण २१,४१३ जागा भरायला ही भरती चाललीये. अर्ज फेब्रुवारी १० ते मार्च ३ दरम्यान घेतले होते.

या राज्यांची यादी आलीये:

आंध्र, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल, जम्मू-कश्मीर, झारखंड, कर्नाटका, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ईशान्य राज्यं, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल.

निवड कशावरून होते?

माध्यमिक शाळेचे गुण आणि उमेदवारानं निवडलेलं पोस्टल सर्कल बघून अंतिम लिस्ट तयार होते. आता यादीत नाव आलेल्यांना कागदपत्र तपासणीसाठी बोलावणार आहेत.

GDS मेरिट लिस्ट डाउनलोड कशी करायची?

  1. indiapostgdsonline.gov.in वर जा

  2. राज्य निवडा

  3. “Shortlisted Candidates” किंवा “Merit List” वर क्लिक करा

  4. Ctrl+F दाबून तुमचं नाव बघा

  5. यादी डाउनलोड करा

  6. एक प्रिंट आउट ठेवा – पुढच्यासाठी उपयोगी!

Leave A Reply

Your email address will not be published.