डाक सेवक भरतीची मोठी अपडेट!-Big GDS Updated Merit List Out!
Big GDS Updated Merit List Out!
ग्रामिण भागात नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार मंडळींसाठी एक दिलासादायक बातमी हाय. इंडिया पोस्टनं ग्रामीण डाक सेवक भरती २०२५ साठी तिसरी गुणवत्ता यादी (Merit List) जाहीर केली हाय. ज्यांनी अर्ज भरले होते, त्यांनी आता आपला निकाल बघायला हवा.
तुमचा निकाल बघायला, इंडिया पोस्टच्या indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथं तुम्हाला राज्यनिहाय यादी सापडेल. त्या PDF मध्ये जाऊन तुमचा नोंदणी क्रमांक Ctrl+F
करून शोधा. तिथं तुमचं नाव असल्यास तुम्ही पुढच्या टप्प्यासाठी पात्र ठरलेले आहात.
निकाल कसा शोधायचा – एक झटक्यात समजून घ्या:
-
स्टेप 1: इंडिया पोस्टची अधिकृत वेबसाईट उघडा 👉 indiapostgdsonline.gov.in
-
स्टेप 2: खाली स्क्रोल करून “Online Engagement” विभागात जा
-
स्टेप 3: तिथं तुमचं राज्य निवडा
-
स्टेप 4: “Third Merit List PDF” वर क्लिक करा
-
स्टेप 5:
Ctrl+F
दाबून तुमचा नोंदणी क्रमांक शोधा
पुढचं काय?
ज्यांचं नाव यादीत आलंय, त्यांना आता Document Verification (DV) साठी बोलावलं जाणार हाय. मोबाईल नंबरवर मेसेज येईल की कोणत्या तारखेला आणि कुठं जायचंय. सगळी कागदपत्रं घेऊन हजर व्हायचंय.
ही भरती मोहीम देशभरातल्या सुमारे २१,४१३ रिक्त पदांसाठी राबवली जातीय. अजून माहिती पाहिजे असल्यास वर दिलेली वेबसाइट बघा.