MPSC परीक्षा पास तरुणांना १५००० रुपये मिळणार !
BARTI's MPSC Financial Aid!
बार्टी पुणे (BARTI Pune) मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2024 (MPSC Civil Engineering Service Prelims 2024) उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.
आर्थिक सहाय्य पात्रता:
या योजनेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा. त्याचबरोबर उमेदवार अनुसूचित जातीचा असावा. 8 एप्रिल 2025 रोजी जाहीर झालेल्या स्थापत्य अभियांत्रिकी पूर्व परीक्षा 2024 मध्ये तो उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
किती आर्थिक सहाय्य मिळणार?
मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना बार्टीमार्फत १५,००० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. हे सहाय्य मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी वापरता येईल.
अर्ज करण्याची प्रक्रिया:
उमेदवाराने दिलेल्या Google Form लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मे 2025 आहे. ऑनलाइन अर्ज भरणे अनिवार्य असून, अपूर्ण किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
ऑफलाइन अर्ज:
ऑनलाइन अर्जासोबतच जाहिरातीत दिलेल्या फॉर्ममध्ये सर्व माहिती अचूक भरून, आवश्यक कागदपत्रांसह बार्टी पुणे कार्यालयात 20 मे 2025 पर्यंत पोस्ट/कुरियरने पाठवावा. पाकिटावर “एमपीएससी स्थापत्य अभियांत्रिकी 2024 मुख्य परीक्षा आर्थिक सहाय्य” असे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे:
- जात प्रमाणपत्र / जात वैधता प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला / डोमिसाइल प्रमाणपत्र
- एमपीएससी स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2024 चे प्रवेश पत्र
- आधार कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची छायांकित प्रत (खाते फक्त अर्जदाराच्या नावावरच असावे)
बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी स्पष्ट केले आहे की, केवळ ऑनलाइन अर्ज किंवा फक्त हार्ड कॉपी जमा केल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. दोन्ही प्रकारे अर्ज करणे अनिवार्य आहे.