SBI मध्ये ३२३३ जागांसाठी मेगा भरती !आजच अर्ज करा -SBI Recruitment 2025: 3233 Vacancies!

SBI Recruitment 2025: 3233 Vacancies!

स्टेट बँक ऑफ इंडियात (SBI) सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) या पदासाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. जे लोक बँकेत नोकरीचं स्वप्न बघत आहेत, त्यांच्यासाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ मे आहे.

SBI Recruitment 2025: 3233 Vacancies!

किती जागा आणि निवड प्रक्रिया:
या भरती मोहिमेमध्ये एकूण ३२३३ रिक्त पदं भरण्यात येणार आहेत. उमेदवारांची निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा, स्क्रीनिंग, मुलाखत आणि स्थानिक भाषा प्रवीणता चाचणी यावर आधारित असेल.

पात्रता निकष:
अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर पदवी असावी. मेडिसिन, इंजिनियरिंग, चार्टर्ड अकाउंटन्सी किंवा कॉस्ट अकाउंटन्सीमधील पदवीधर देखील पात्र ठरतील. उमेदवाराचं वय २१ ते ३० वर्षांदरम्यान असणं आवश्यक आहे.

अर्ज शुल्क:

  • सामान्य/OBC/EWS प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ₹७५० आहे.

  • SC/ST/PwBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क पूर्णपणे मोफत आहे.

  • अर्ज शुल्क भरण्यासाठी डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI वापरता येईल.

अर्ज कसा करायचा?

  1. सर्वप्रथम SBI च्या अधिकृत वेबसाईटला (https://sbi.co.in/) भेट द्या.

  2. “Career” विभागावर क्लिक करा.

  3. SBI CBO २०२५ अर्ज लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.

  4. तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीसह नोंदणी करा.

  5. शैक्षणिक आणि वैयक्तिक माहिती व्यवस्थित भरा.

  6. आवश्यक कागदपत्रं, स्कॅन केलेले छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा.

  7. अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.

तर मग, संधी दारावर आली आहे! तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. आजच अर्ज करा आणि आपल्या भविष्यासाठी एक मजबूत पाऊल उचला!

Leave A Reply

Your email address will not be published.