१०वी चा निकाल येत्या १५ मे २०२५ ला लागणार !-Results Bell Rings!
Results Bell Rings!
महाराष्ट्र राज्य बोर्डानं SSC परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ दरम्यान राज्यातल्या जवळपास १००० परीक्षा केंद्रांवर पार पाडल्या. ह्या वर्षी जवळपास २० लाख विद्यार्थी परीक्षा दिले. SSC परीक्षा देणाऱ्यांचा आकडा दरवर्षी वाढतच चाललाय. अजून SSC निकाल जाहीर झालेला नाही, पण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जाहीर केलंय की, १५ मे २०२५ रोजी SSC निकाल अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली होती. विशेषतः नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ इथं विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला. SSC परीक्षेचं नियोजन अगदी काटेकोरपणे करण्यात आलं होतं, आणि सुरक्षितता व परीक्षा प्रक्रियेचं योग्य पालन करण्यात आलं.
विद्यार्थ्यांना त्यांच्या रोल नंबर आणि नोंदणी क्रमांकाची माहिती हाताशी ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय, जेणेकरून निकाल जाहीर झाल्यावर लगेच तपासता येईल. मागच्या वर्षी SSC निकाल २७ मे २०२४ रोजी लागला होता आणि जवळपास ९५% विद्यार्थी पास झाले होते. यंदाच्या वर्षीही निकालाची उंची वाढण्याची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र आणि रोल नंबर आधीच तयार ठेवावे.
निकाल पाहण्यासाठी खालील पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करा:
१. अधिकृत वेबसाईट https://www.mahahsscboard.in/ वर जा.
२. “SSC Result 2025” या पर्यायावर क्लिक करा.
३. तुमचा रोल नंबर आणि नोंदणी क्रमांक भरा.
४. ‘View Result’ या बटणावर क्लिक करा.
५. निकाल स्क्रीनवर दिसेल. प्रिंट घेण्यासाठी ‘Print’ या बटणावर क्लिक करा.
विदर्भातील विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळो, हीच शुभेच्छा!