१२वी च्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रके डिजिलॉकरमध्ये उपलब्ध !-Mark Sheets Available in DigiLocker!

Mark Sheets Available in DigiLocker!

नाशिक विभागीय शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा १२वीच्या एकूण १ लाख २७ हजार ४७३ विद्यार्थ्यांचे गुणपत्रक डिजिलॉकरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, विभागातील १६ हजार ६६३ विद्यार्थी अपार आयडी लिंक न झाल्यामुळे या सुविधेपासून वंचित राहिले आहेत.

Mark Sheets Available in DigiLocker!

राज्य मंडळाने ५ मे रोजी १२वीचा निकाल जाहीर केला. नाशिक विभागात १ लाख ५८ हजार ५९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १ लाख ४४ हजार १३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अपार आयडीची नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रके मिळू शकली नाहीत.

अपार आयडी म्हणजे ‘ऑटोमेटेड पर्मनंट अॅकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री’, जे भारतातील शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना प्रदान केले जाते. या डिजिटल ओळखपत्रात शैक्षणिक रेकॉर्ड सेव्ह केले जातात. आयडी तयार असलेल्या विद्यार्थ्यांनाच गुणपत्रिका डिजिलॉकरवर मिळू शकतात.

शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे अपार आयडी वेळेत तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही काही ठिकाणी अडचणी आल्याने काही विद्यार्थी या सेवेसाठी अपात्र ठरले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.