बृहन्मुंबई महानगरपालिकेची दुय्यम अभियंता (स्थापत्य) संवर्गातील परीक्षा, जी आधी ९ मार्च २०२५ रोजी होणार होती, ती काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा नव्या वेळापत्रकानुसार १३ आणि १४ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र आता अधिकृतपणे जाहीर करण्यात आले असून, उमेदवारांना ते IBPS ऑनलाइन पोर्टल या लिंकवरून डाउनलोड करता येईल.
परीक्षेचे ठिकाण: महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा पार पडणार आहे.