UPSC नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर ; शक्ती दुबे अव्वल!-UPSC Results Out Shakti Dubey Tops!
UPSC Results Out Shakti Dubey Tops!
UPSC नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर, आयोगाने आता परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांचे गुणसुद्धा अधिकृतपणे प्रसिद्ध केले आहेत. उमेदवारांना त्यांच्या गुणांची माहिती आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर उपलब्ध करून दिली आहे. या वर्षी परीक्षेत शक्ती दुबे याने सर्वाधिक गुण मिळवून टॉप रँक पटकावली आहे.
त्याने मुख्य परीक्षेत 843 गुण मिळवले आणि मुलाखतीत 200 गुण मिळवत एकूण 1043 गुणांची कमाई केली आहे. दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या हर्षिता गोयलने मुख्य परीक्षेत 851 गुण व मुलाखतीत 187 गुण मिळवून एकूण 1038 गुण मिळवले आहेत. तर तिसऱ्या स्थानावर पुण्याचा अर्चित पराग डोंगरे आहे, ज्याने मुख्य परीक्षेत 848 गुण आणि मुलाखतीत 190 गुण मिळवून एकूण 1038 गुणांची कमाई केली आहे.
टॉप 10 यादीत अन्य उमेदवारांनीही चांगली कामगिरी केली आहे. शाह मार्गी चिरागने 825 मुख्य गुण आणि 210 मुलाखत गुण मिळवून एकूण 1035 गुण मिळवले आहेत. आकाश गर्गने 831 मुख्य आणि 201 मुलाखत गुणांसह एकूण 1032 गुण मिळवले आहेत. कोमल पुनिया हिने 856 मुख्य गुण आणि 176 मुलाखत गुण मिळवले, तिचा एकूण स्कोर 1032 झाला आहे. याशिवाय आयुषी बन्सल (1031 गुण), राज कृष्ण झा (1031 गुण), आदित्य विक्रम अग्रवाल (1027 गुण), आणि मयंक त्रिपाठी (1027 गुण) यांनीही उल्लेखनीय स्थान पटकावले आहे.
उमेदवार 2 मे 2025 पासून आपले वैयक्तिक स्कोअरकार्ड अधिकृत वेबसाइटवरून लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरून डाउनलोड करू शकतात. निकाल तपासताना, परीक्षेचा गट, रोल नंबर, अर्ज क्रमांक, एकूण 600 पैकी मिळालेले गुण आणि गटविशिष्ट पात्रतेची स्थिती असे सर्व तपशील पाहता येतील. UPSC च्या या ऐतिहासिक यशासाठी सर्व उमेदवारांचे अभिनंदन होत आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.