राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBEMS) NEET सुपर स्पेशालिटी परीक्षा 2024 चा निकाल जाहीर!-NEET SS Result Out!

NEET SS Result Out!

राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (NBEMS) NEET सुपर स्पेशालिटी परीक्षा 2024 चा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी आता अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर आपला निकाल पाहता येणार आहे.

NEET SS Result Out!

निकाल गटांनुसार आणि रोल नंबरच्या वाढत्या क्रमाने प्रसिद्ध करण्यात आला आहे. जाहीर केलेल्या PDF मध्ये प्रश्नपत्रिका गट, रोल नंबर, अर्ज आयडी, ६०० पैकी मिळालेले गुण आणि गट-विशिष्ट पात्रता स्थिती यांचा समावेश आहे.

उमेदवारांना २ मे २०२५ पासून अधिकृत संकेतस्थळावरून आपले स्कोअरकार्ड डाउनलोड करता येणार आहे. यासाठी लॉगिन करताना आवश्यक क्रेडेन्शियल्स वापरणे गरजेचे आहे.

निकाल कसा पाहाल?

  • प्रथम अधिकृत वेबसाइट natboard.edu.in ला भेट द्या.

  • होमपेजवर ‘NEET SS 2024 Result’ लिंकवर क्लिक करा.

  • त्यानंतर, ‘View Result’ लिंकवर क्लिक करा.

  • निकालाची PDF फाईल स्क्रीनवर उघडेल.

  • ती PDF डाउनलोड करा आणि गरज पडल्यास प्रिंटआउट काढा.

Leave A Reply

Your email address will not be published.