खुशखबर !! India Post GDS भरती निकाल जाहीर झाला ! असा करा आपला निकाल डाउनलोड । India Post GDS DV Result released 2025
India Post GDS DV Result released 2025
भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती प्रक्रियेतील महत्त्वाची यादी जाहीर केली असून, राज्यातील हजारो उमेदवारांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. विभागाने कागदपत्र पडताळणीसाठी (Document Verification) यादी आणि अर्ज स्थितीची माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे.
यंदा एकूण 21,413 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे आणि निवड इयत्ता 10वीच्या गुणांवर आधारित करण्यात येणार आहे. उमेदवारांनी आपल्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
मुख्यपृष्ठावर “GDS अर्ज स्थिती” लिंकवर क्लिक करून नोंदणी क्रमांक टाकल्यास अर्जाची स्थिती PDF स्वरूपात स्क्रीनवर दिसेल, जी डाउनलोड करून प्रिंट करता येते. याच संकेतस्थळावर “गुणवत्ता यादी 2025” या लिंकवर क्लिक करून अर्ज क्रमांक व जन्मतारीख टाकल्यास गुणवत्तेनुसार तयार केलेली यादी पाहता येईल.
ही यादी सुद्धा PDF स्वरूपात डाऊनलोड करून प्रिंट करता येते. यादीत नाव आलेल्या उमेदवारांनी पुढील टप्पा म्हणून आवश्यक कागदपत्रांची तयारी ठेवावी, कारण लवकरच विभागाकडून कागदपत्र पडताळणीसाठी अधिकृत सूचना पाठवली जाणार आहे.
भरती प्रक्रियेतील सर्व अपडेट्ससाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट देत राहावे.