लाडकी बहीण योजनेत २१ वर्ष पूर्ण झालेल्या बहिणींना केव्हा मिळणार लाभ ? माहिती जाणून घ्या
When will sisters who have completed 21 years of age receive the benefits under the Ladki Bahin Yojana?
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना दरमहा आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र, अनेक महिलांनी २१ वर्षे पूर्ण केल्यानंतरही अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे, २१ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना लाभ नेमका केव्हा मिळणार?, असा प्रश्न अनेक बहिणींनी उपस्थित केला आहे.
योजनेनुसार, ज्या महिलांचे वय २१ वर्षे पूर्ण झाले असून त्या इतर सर्व निकषांनुसार पात्र आहेत, त्यांना दरमहा १,५०० रुपयांचा थेट बँक खात्यात लाभ मिळण्याची अट आहे. मात्र, अलीकडील काही महिन्यांपासून अर्ज केलेल्या आणि २१ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना अद्याप खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे अनेक ठिकाणी समोर येत आहे.
यासंदर्भात शासनाकडून स्पष्टता येणे अपेक्षित असून, लाभार्थ्यांची माहिती संकलित करून पात्रतेची पडताळणी केल्यानंतर टप्प्याटप्प्याने लाभ वाटप करण्यात येईल, अशी प्राथमिक माहिती मिळते.
दरम्यान, अनेक लाभार्थींनी सोशल मीडियावरून तसेच स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रारी करत आपल्या नाराजीचा सूर व्यक्त केला यामुळे शासनाने लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करून पात्र महिलांच्या खात्यात लाभ जमा करावा, अशी मागणी होत आहे.
When I’ll get my April installment