खुशखबर !! १०वी, १२वीचा निकाल लवकरच cbse.gov.in वर जाहीर होणार ! निकाल कसा पाहायचा ते जाणून घ्या – Class 10th, 12th Result Released Soon At cbse.gov.in
Class 10th, 12th Result Released Soon At cbse.gov.in
CBSE 10वी व 12वीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता; डिजिलॉकरद्वारे सहज पाहता येणार निकाल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) 2024–25 शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 10वी आणि 12वीच्या निकालाच्या तयारीत असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळण्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
अधिकृत निकाल जाहीर होण्याची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नसली, तरी मागील वर्षांच्या पार्श्वभूमीवर मे 2025 च्या अखेरीस निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
मागील वर्षांकडे पाहता, 2024 मध्ये CBSE निकाल 13 मे रोजी, तर 2023 मध्ये 12 मे रोजी जाहीर करण्यात आला होता. 2022 मध्ये कोरोनाच्या प्रभावामुळे निकाल 22 जुलैला उशिरा जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे मंडळाचा नियमित वेळापत्रक विचारात घेतल्यास, यंदाही निकाल मे महिन्याच्या मध्य किंवा शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे.
2024 च्या निकालातील तपशील
इयत्ता 10वीसाठी, 2024 मध्ये एकूण 21,84,117 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 21,65,805 विद्यार्थी परीक्षेला हजर झाले आणि 20,16,779 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परिणामी, 10वीचा एकूण उत्तीर्ण होण्याचा टक्का 93.12% होता.
इयत्ता 12वीसाठी, एकूण 16,80,256 विद्यार्थ्यांची नोंदणी, त्यापैकी 16,60,511 विद्यार्थी उपस्थित, आणि त्यातले 14,50,174 इयत्ता 12वीसाठी, एकूण 16,80,256 विद्यार्थ्यांची नोंदणी, त्यापैकी 16,60,511 विद्यार्थी उपस्थित, आणि त्यातले 14,50,174 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 12वीचा पास टक्का 87.33% इतका होता.
विशेष म्हणजे, हा निकाल 2023 मधील निकालासारखाच राहिला, जिथे 10वीसाठी 93.12% आणि 12वीसाठी 87.33% विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
निकाल कसा पाहाल?
CBSE बोर्ड आपले निकाल अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर आणि DigiLocker प्लॅटफॉर्मवर जाहीर करणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहण्यासाठी DigiLocker अकाऊंटमध्ये लॉगिन करून त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि स्कूल कोड वापरावा लागेल.