UGC-NET परीक्षेसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली ; त्वरित अर्ज करा ! संधी गमावू नका!-UGC NET 2025: Apply Now!
UGC NET 2025: Apply Now!
ज्या उमेदवारांना प्राध्यापक किंवा संशोधक म्हणून करिअर घडवायचं आहे, त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने UGC-NET जून 2025 परीक्षेची अधिकृत अधिसूचना नुकतीच जाहीर केली असून, या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया १६ एप्रिल २०२५ पासून सुरू झाली आहे.
यावर्षी अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ आणि डिजिटल स्वरूपात करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ मे २०२५ असून, पात्र उमेदवारांनी वेळेच्या आत अधिकृत वेबसाइटवर ugcnet.nta.nic.in जाऊन आपला अर्ज सादर करावा. अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सूचना, पात्रतेचे निकष, परीक्षेचा ढाचा (Exam Pattern), विषयांची यादी, शुल्क तपशील आदी माहिती वेबसाइटवर पुरवण्यात आली आहे.
यूजीसी नेट परीक्षा का महत्त्वाची आहे?
UGC-NET ही परीक्षा भारतातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये असिस्टंट प्रोफेसर (Assistant Professor) पदासाठी पात्रता प्राप्त करण्यासाठी आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) मिळवण्यासाठी घेतली जाते. त्यामुळे ही परीक्षा शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात करिअर करावयाच्या विद्यार्थ्यांसाठी फारच महत्त्वाची आहे.