मुला-मुलींसाठी आधार बायोमेट्रिक अपडेट करायचे आहे ; मोफत बायोमेट्रिक अपडेटची संधी!-Free Biometric Update for Kids!

Free Biometric Update for Kids!

आपण आपल्या मुलांचं आधार कार्ड लहान वयात केलं असेल, तर आता ते मोठं होत असताना त्यात बायोमेट्रिक माहिती – म्हणजे त्यांच्या बोटांचे ठसे (फिंगरप्रिंट), डोळ्यांची स्कॅन (आयरिस) आणि चेहऱ्याचा फोटो – अपडेट करणं अत्यंत आवश्यक झालं आहे.

Free Biometric Update for Kids!

भारत सरकारने हे अपडेट काही विशिष्ट वयोगटासाठी बंधनकारक केलं आहे. यामध्ये ५ ते ७ वर्षे वयोगटातील बालकांसाठी आणि १५ ते १७ वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींसाठी आधार बायोमेट्रिक अपडेट करावं लागणार आहे. याला मँडेटरी बायोमेट्रिक अपडेट (MBU) असं म्हणतात.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण ४ लाख ५१ हजार ५३६ मुलांचं आधार कार्ड अद्यापही अपडेट व्हायचं बाकी आहे. त्यापैकी २ लाख ६६ हजार ४२९ मुलं ५ ते ७ वर्ष वयोगटातील आहेत, आणि १ लाख ८५ हजार १०७ मुलं १५ ते १७ वर्ष वयोगटातील आहेत. या मुलांच्या आधार कार्डांची बायोमेट्रिक माहिती जुनी असल्याने, सरकारच्या विविध योजनेसाठी किंवा ओळखीच्या पुराव्याकरता योग्य धरली जाणार नाही.

जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक श्री. शरद दिवेकर यांनी यासंदर्भात नागरिकांना आवाहन केलं आहे की, त्यांनी आपल्या बालकांचे आधार कार्ड वेळीच अपडेट करून घ्यावं. विशेष बाब म्हणजे, या बायोमेट्रिक अपडेटसाठी कोणताही शुल्क आकारला जाणार नाही, म्हणजेच हे काम मोफत केलं जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही दलाल किंवा मध्यस्थाकडे जाऊ नये आणि अधिकृत केंद्रावरच काम करावं.

हे बायोमेट्रिक अपडेट केल्याने मुलांच्या शाळेतील शिष्यवृत्ती, बँक खाते उघडणं, आरोग्य विमा योजना, सरकारी मदतीच्या योजना आणि अन्य सेवांमध्ये सहज प्रवेश मिळेल. उशीर केल्यास या सेवांमध्ये अडथळे येऊ शकतात. यासाठी, आवश्यक माहिती मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.