खुशखबर!! परीक्षेशिवाय IGNOU मध्ये मिळवा सरकारी नोकरी ; महिना ६००००रुपये पगार ! आजच अर्ज करा
Golden Job Opportunity at IGNOU!
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात (IGNOU) नोकरीची भारी संधी चालून आलीय. विद्यापीठाच्या कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्स विभागात काही पदांसाठी भरती निघालीय.
तुम्ही “कन्सल्टंट”, “सीनियर कन्सल्टंट” आणि “अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असोसिएट” अशा पदांसाठी अर्ज करू शकता. अर्जासाठी शेवटची तारीख २० एप्रिल २०२५ आहे. सविस्तर माहिती आणि अर्जाची प्रक्रिया IGNOU च्या अधिकृत वेबसाइटवर ignou.ac.in दिली आहे.
रिक्त जागा:
- कन्सल्टंट – १
- सीनियर कन्सल्टंट – १
- अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असोसिएट – १
शैक्षणिक पात्रता:
- कन्सल्टंटसाठी – सिव्हिल/इलेक्ट्रिकलमध्ये B.E./B.Tech
- सीनियर कन्सल्टंट – ग्रॅज्युएशन
- अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असोसिएट – ग्रॅज्युएशन, इंग्रजी टायपिंग कोर्स, MS Office यायला पाहिजे
पगार – साधारण ₹60,000 पर्यंत मिळणार
अर्ज कसा करायचा?
- सीनियर कन्सल्टंटसाठी – तुमचा बायोडाटा आणि कागदपत्रं acdadmin@ignou.ac.in या मेलवर पाठवा.
- कन्सल्टंटसाठी – IGNOU वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करून, भरून खालील पत्त्यावर पोस्ट करा: Deputy Registrar, Recruitment Cell, Block-7, Room No.13, IGNOU, Maidan Garhi, New Delhi-110068
आणखी एक संधी:
CSIR-IIP आणि भारत पेट्रोलियममधील शास्त्रज्ञ पदांसाठीही भरती चालू आहे. इथे ९ पदं रिक्त आहेत. अर्जाची अंतिम तारीख आहे ५ मे २०२५. या पदासाठी उमेदवाराकडे M.E/M.Tech आणि Ph.D असणं गरजेचं आहे.
ही दोन्ही सरकारी नोकऱ्यांची सुवर्णसंधी गमावू नका!