तरुण अभियंत्यांसाठी उत्तम संधी !! DRDO अंतर्गत अप्रेंटिसशिप भरती सुरु !– !!-DRDO Apprentice 2025!
DRDO Apprentice 2025!
DRDO अप्रेंटिस भरती 2025: कोण म्हणतं काहीही मोफत मिळत नाही? DRDO, म्हणजेच भारतातील सर्वोत्तम संरक्षण संशोधन संस्था, आता तरुणांना अप्रेंटिसशिपसाठी एक सुवर्णसंधी देत आहे. आणि हो, यात प्रशिक्षणादरम्यान दर महिन्याचा स्टायपेंडही मिळणार आहे!
तुम्ही जर नुकतेच शिक्षण पूर्ण केले असेल आणि करिअरला एक चांगली सुरुवात हवी असेल, तर ही संधी नक्कीच हुकवू नका. DRDO च्या गॅस टर्बाईन रिसर्च एस्टॅब्लिशमेंट (GTRE) विभागाने अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
तुम्हाला अर्ज करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला NATS पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी, तुम्ही एनएटीएसच्या अधिकृत वेबसाइट nats.education.gov.in वर जाऊन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ मे २०२५ आहे. चला, पाहूया पदांची माहिती, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया.
पदांची माहिती:
-
पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी (इंजिनीअरिंग) – ७५
-
पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी (नॉन-इंजिनीअरिंग) – ३०
-
डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी – २०
-
ITI अप्रेंटिस ट्रेनी – २५
शैक्षणिक पात्रता:
-
इंजिनीअरिंग अप्रेंटिस: B.E/B.Tech (इंजिनीअरिंग किंवा टेक्नॉलॉजी) धारक.
-
नॉन-इंजिनीअरिंग अप्रेंटिस: BA, B.Sc, BCA, BBA पदवीधारक.
-
डिप्लोमा अप्रेंटिस: पॉलिटेक्निक डिप्लोमा (मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कंप्युटर सायन्स) धारक.
-
ITI अप्रेंटिस: फिटर, टर्नर, वेल्डर किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI पूर्ण केलेले उमेदवार.
स्टायपेंड:
-
ग्रॅज्युएट अप्रेंटिस (B.E/B.Tech): प्रतिमहिना ९,००० रुपये.
-
डिप्लोमा अप्रेंटिस: प्रतिमहिना ८,००० रुपये.
-
ITI अप्रेंटिस: प्रतिमहिना ७,००० रुपये.
-
नॉन-इंजिनीअरिंग अप्रेंटिस: प्रतिमहिना ९,००० रुपये.