शाळांतील शिपाई कायम हद्दपार!-Peons Out of Schools Permanently!

Peons Out of Schools Permanently!

पहाटे शाळेचं गेट उघडणारा, शिक्षकांसाठी धावपळ करणारा, मुलांना शिस्त लावणारा – हा शिपाई आता शाळेतून हद्दपार होतोय.राज्यानं घेतलेल्या निर्णयामुळे, आता शिपाईचं काम कायमस्वरूपी नाही. भरती झालीच, तर ती फक्त कंत्राटी!
सध्या शिक्षकेतर भरती सुरू आहे, पण त्यात शिपायाला जागा नाहीच!

Peons Out of Schools Permanently!

पूर्वी शाळेचा रक्षक असलेला शिपाई, आता शाळेच्या गेटबाहेरच राहणार!
लिपिक, ग्रंथपाल, लॅब असिस्टंट मिळतील शाळांना, पण शिपाई फक्त तात्पुरता!

कंत्राटी शिपायाला ना पूर्ण वेळ असणं लागतं, ना त्याला बऱ्यापैकी पगार मिळतो – फक्त ५ ते १० हजार!
ना त्यावर विश्वास ठेवता येतो, ना त्याच्यावर जबाबदारी टाकता येते.

“शिपाई म्हणजे शाळेचं हृदय होतं!”
मुंबईच्या मुख्याध्यापक संघटनेचे संजय पाटील सांगतात –
“शिपाई सतत फिरत असतो. सीसीटीव्हीपेक्षा शिपाईच बारीक नजर ठेवतो. मुलं काही गोंधळ करत असतील, तर तोच थांबवतो.”

“कंत्राटी माणूस टिकेलच याची खात्री नाय!”
महेंद्र गणपुले सर म्हणतात –
“शिपाई हा मुलांसाठी पहिला माणूस असतो. पण कंत्राटी शिपाईला ना स्थिरता, ना शाळेसाठी निष्ठा!”

आज शाळेच्या व्यवस्थापनावरच प्रश्न उभा राहिलाय – कारण शाळेचा आधारवडच नाहीसा होतोय…

Leave A Reply

Your email address will not be published.