खुशखबर !! १० वी उत्तीर्ण तरुणांसाठी रेल्वेत सहायक लोको पायलट पदांची भरती ; एकूण ९००० रिक्त जागा ! आजच अर्ज करा
Railway ALP Recruitment 2025 Begins!
रेल्वेमध्ये नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खूप मोठी संधी आलीये! केंद्र सरकारच्या रेल्वे भरती मंडळानं सहाय्यक लोको पायलट (ALP) पदांसाठी भरती जाहीर केलीये. आजपासून म्हणजे १० एप्रिल २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालीये आणि ९ मे २०२५ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
या भरतीत भारतभरातल्या विविध रेल्वे विभागांमध्ये एकूण ९,९७० पदं भरली जाणार आहेत. फक्त १०वी उत्तीर्ण आणि आयटीआय किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा/डिग्री असलेले उमेदवारच अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा काय आहे?
अर्ज करणाऱ्याचं वय १ जुलै २०२५ रोजी १८ ते ३० वर्षांदरम्यान असणं गरजेचं आहे. राखीव वर्गासाठी शासन नियमांप्रमाणं वयोमर्यादेत सूट मिळणार आहे.
अर्ज कसा करायचा?
- RRB च्या अधिकृत वेबसाइटवर जा
- ALP भरती २०२५ च्या लिंकवर क्लिक करा
- नोंदणी करा (Register करा)
- अर्जात सगळी माहिती भरून, आवश्यक कागदपत्रं अपलोड करा
- तुमच्या श्रेणीनुसार शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा
- पूर्ण भरलेला अर्ज प्रिंट करून ठेवा