मोठा बदल !! अग्निवीर परीक्षा आता १३ भाषांमध्ये!-Agniveer Exam Now in 13 Languages!

Agniveer Exam Now in 13 Languages!

या वर्षीपासून अग्निवीर भरतीत जबरदस्त बदल करण्यात आले आहेत. अगोदर जसं फक्त हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांपुरतंच लेखी परीक्षा मर्यादित होती, तसं आता नसेल. यंदापासून उमेदवारांना थेट १३ वेगवेगळ्या भाषांमधून आपली सोयीची भाषा निवडून परीक्षा देता येणार आहे. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, मल्याळम, तमिळ, तेलगू, कन्नड, उर्दू, गुजराती, पंजाबी, उडिया, बंगाली आणि आसामी या भाषांचा समावेश आहे.

Agniveer Exam Now in 13 Languages!

उमेदवारांना आता आपली परीक्षेची भाषा निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलं आहे, जे आधी नव्हतं. यामुळे ग्रामीण भागातले, स्थानिक भाषांमध्ये शिकलेले मुलंमुली आता सहजतेनं स्पर्धा करू शकतील.

इतकंच नव्हे तर, अजून काही महत्त्वाचे बदल पण करण्यात आले आहेत. यंदा भरतीमध्ये उमेदवारांची शारीरिक शर्यत चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये घेतली जाईल, जेणेकरून निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक व नीटनेटकी राहील.

CEE अर्जातही बदल: उमेदवार आता एकाच अर्जात दोन पदांसाठी निवड करू शकतात. अर्ज करताना इच्छित पदांची पसंती द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर, रॅली दरम्यान ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी म्हणजे अंगठ्याचा ठसा व डोळ्याचं रेटिना स्कॅनिंग केली जाईल.

अग्निवीर परीक्षा दोन टप्प्यांमध्ये पार पडणार:

  • पहिला टप्पा: लेखी परीक्षा – ही १०० गुणांची ऑनलाइन संगणकावर आधारित MCQ प्रकारची परीक्षा असेल.
  • दुसरा टप्पा: शारीरिक कार्यक्षमता चाचणी व भरती रॅली.

या सगळ्या सुधारणांमुळे भरती अधिक सर्वसमावेशक व पारदर्शक होणार आहे. आता आपल्या भाषेतूनही सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार हे खरोखरच मोठं पाऊल आहे!

Leave A Reply

Your email address will not be published.