पशुसंवर्धन मेगा भरती २७९५ रिक्त पदे !-Animal Husbandry Mega Hiring 2795 Posts!
Animal Husbandry Mega Hiring 2795 Posts!
राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठं पाऊल उचललं असून, पशुधन विकास अधिकारी (Group A) या संवर्गातील २७९५ रिक्त पदं लवकरच भरली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (MPSC) या पदांसाठी अधिकृत मागणी पत्रही सादर करण्यात आलं आहे.
ग्रामीण भागात वेगानं काम करण्यासाठी ही भरती अत्यंत गरजेची होती. कारण सध्या एकूण ४६८४ मंजूर पदांपैकी फक्त १८८६ पदं भरलेली असून उरलेली २८०६ पदं रिक्त आहेत, ज्यामुळे कामावर मोठा ताण येत होता.
मंत्री मुंडे यांनी याला गांभीर्याने घेत, ही भरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये आधीच्या जाहिरात क्र. १२/२०२२ मधून प्रतिक्षायादीतील ११ उमेदवारांनाही संधी दिली जाणार आहे.
या भरतीमुळे गावागावातील शेतकरी व पशुपालकांना दर्जेदार सेवा मिळणार, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. आता ही भरती पूर्ण झाल्यानंतर राज्याच्या पशुसंवर्धन यंत्रणेला मोठा बळकटीचा हात मिळणार आहे!
लवकरच अधिकृत जाहिरात आणि प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता – अपडेटसाठी संपर्कात राहा!