TAIT मोफत प्रशिक्षण!-Free TAIT Coaching!

Free TAIT Coaching!

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेच्या तयारीसाठी महाज्योतीमार्फत चार महिन्यांचं मोफत ऑनलाइन पूर्वप्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी असून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

Free TAIT Coaching!

अर्ज करण्याची अंतिम तारीख: २० एप्रिल २०२५

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ: www.mahajyoti.org.in

पात्रता अटी:

  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • वय ४० वर्षांखालील असणे आवश्यक.
  • नॉन-क्रिमिलेअर गटातील असावा.
  • उमेदवार ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी, विशेष मागास प्रवर्गातील असावा.

प्रशिक्षण स्वरूप:

  • चार महिन्यांचं ऑनलाइन प्रशिक्षण
  • अभ्यासक्रम: TAIT परीक्षेच्या अद्ययावत अभ्यासक्रमानुसार मार्गदर्शन
  • माध्यम: डिजिटल – घरी बसून सहभाग

आवश्यक कागदपत्रं:

  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • नॉन-क्रिमिलेअर सर्टिफिकेट
  • बारावी, पदवी व B.Ed/D.Ed गुणपत्रिका
  • TET/CTET निकाल (असल्यास)
  • दिव्यांग सर्टिफिकेट / अनाथ दाखला (असल्यास)
Leave A Reply

Your email address will not be published.